१.१ प्रस्तावना :
लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची महत्वाची शाखा आहे.
मानवी लोकसंख्या,लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि
आकृतीबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. एखाद्या प्रदेशाच्या
विकासावर लोकसंख्येचे होणारे परिणामही या शाखेमध्ये अभ्यासले जातात.
या पाठामध्ये आपण मानवी लोकसंख्या एक संसाधन म्हणून अभ्यासणार
आहोत.


या वरील वर्तुळाकृती आकृत्यांना विभाजित वर्तुळ असे म्हणतात. हा एक माहिती
(विदा) सादरीकरणाचा एक प्रकार आहे.
पहिल्या विभाजित वर्तुळात खंडनिहाय भूमीची उपलब्धता (%) तर
दुसऱ्या विभाजित वर्तुळात खंडनिहाय लोकसंख्येचे वितरण % (2019) दर्शविले आहे.
दिलेल्या दोन्ही विभाजित वर्तुळांचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे
द्या.
1. 1 कोणत्या खंडामध्ये सर्वात
कमी लोकसंख्या आहे? ऑस्ट्रेलिया
2.
कोणत्या खंडामध्ये सर्वात
कमी लोकसंख्या तसेच भूमीची उपलब्धता आहे? ऑस्ट्रेलिया
3.
कोणत्या खंडामध्ये सर्वात
जास्त लोकसंख्या तसेच भूमीची उपलब्धता आहे? आशिया
4.
कोणत्या विभाजित वर्तुळात
एक खंड कमी आहे व त्यामागचे कारण काय असावे?
अंटार्क्टिका खंड दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये नाही कारण तिथे कायमस्वरूपी वास्तव्याची मानवी लोकसंख्या नाही
दोन्ही विभाजित वर्तुळांमधील माहिती आपण एकत्र करू शकतो का? ही माहिती एकत्र
करण्यासाठी कोणती विदा सादरीकरणाची पद्धती वापरावी लागेल?
हो, आपण ही माहिती जोड स्तंभालेखाच्या सहाय्याने दाखवू शकतो.
1.2 लोकसंख्येसंदर्भातील काही महत्वाच्या संकल्पना:
a) लोकसंख्या घनता:
•
लोकसंख्येचे वितरण अधिक
चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी ही संकल्पना महत्वाची ठरते.
• दर चौरस किमी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे लोकसंख्या घनता होय.
· b) ढोबळ जन्मदर:
एका वर्षात दर हजार लोकसंख्येमागे जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे ढोबळ जन्मदर होय.
·
ढोबळ मृत्यूदर:
एका वर्षात एक हजार लोकसंख्येमागे
मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे ढोबळ मृत्यूदर होय
· लोकसंख्या वाढ म्हणजे
आधीच्या लोकसंख्येत सध्या पडलेली भर. सध्याच्या लोकसंख्येतून आधीची
लोकसंख्या वजा केली असता लोकसंख्या वाढ समजते.
· लोकसंख्या
वाढीचा दर
म्हणजे एका विशिष्ट काळात एखाद्या लोकसंख्येत वाढ झालेल्या व्यक्तींच्या संख्येचे
आधीच्या लोकसंख्येशी काढलेले प्रमाण होय.
१.३ जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतीबंध:
वरील विभाजित
आकृत्या व जोड स्तंभाचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की जागतिक
लोकसंख्या व लोकसंख्येची घनता यांचे वितरण असमान आहे या आकृत्या जागतिक
लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
लोकसंख्याशास्त्रीय
म्हणजे काय? लोकसंख्येशी संबंधित विश्लेषणाचा अभ्यास म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय
होय.
जगाचा
प्राकृतिक नकाशाचा लोकसंख्येच्या नकाशाशी तुलनात्मक अभ्यास केला असता खालील मुद्दे
लक्षात येतात.
बर्फाच्छादित
प्रदेश वाळवंटी प्रदेश पर्वतीय प्रदेशांमध्ये विरळ लोकसंख्या आढळते तर नदी खोरे, दऱ्या,
किनारी प्रदेश पठारे, मैदाने या भागांमध्ये दाट लोकसंख्या आढळते.
यावरून
लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा परिणाम असल्याचे दिसून येते.
१.४ लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक:
अ) लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक
१) भूरचना -
समुद्रसपाटीपासूनच्या उंचीतील फरकाला भूरचना असे म्हणतात. भूरचना
भूरुपाद्वारे सहज लक्षात येते. वाळवंटे पर्वतीय डोंगराळ प्रदेश हे
समुद्रसपाटीपासून दूर असतात या ठिकाणी पाण्याची कमतरता ऑक्सिजनची उपलब्धता संसाधने
कमतरता शेतीसाठी आयोग्य जमीन तीव्र उतार या ठिकाण असल्याने येथे मानवी लोकसंख्या
राहू शकत नाही त्यामुळे येथे विरळ लोकसंख्या आढळते उदाहरणार्थ हिमालय पर्वत रांगा
पूर्व व पश्चिम घाट, आल्प्स,रॉकी, सहारा,
कच्छचे रण, अमेझॉनचे जंगल इत्यादी याला काही अपवादही आहेत
जसे की देहराडून, लेह या ठिकाणी पर्वतीय प्रदेश
असूनही लोकसंख्या जास्त आहे.
पठारे,
मैदाने, किनारी प्रदेश हे सपाट असतात या ठिकाणी संसाधनांची
उपलब्धता पुरेशी असते. शेतीसाठी सुपीक मृदा उपलब्ध असते इत्यादी
कारणांमुळे या ठिकाणी दाट लोकसंख्या आढळते. उदाहरणार्थ गंगेच्या मैदानी प्रदेश
दख्खनचे पठार छोटा नागपूर पठार बहुतांश देशांचे किनारी प्रदेश इत्यादी. हे प्रदेश
मानवी लोकसंख्या साठी अनुकूल असतात.
२) हवामान
अति
उष्ण किंवा अतिशीत हवामान हे मानवी लोकसंख्येसाठी प्रतिकूल असते.
उदाहरणार्थ उष्ण किंवा शीत वाळवंटे जसे की सहारा, कच्छचे रण या
भागांमध्ये पाण्याची कमतरता अतिउष्ण तापमान तसेच अमेझॉनचे जंगल या प्रदेशांमध्ये
विरळ लोकसंख्या आढळते. ज्या प्रदेशात मानवी लोकसंख्या अनुकूल हवामान
म्हणजेच अल्हाददायक सरासरी हवामान असते त्या प्रदेशात मानवी लोकसंख्या दाट आढळते
३) पाण्याची उपलब्धता
प्राचीन
काळापासून नद्यांच्या काठी अनेक वसाहती उदयास आल्याचे आपण अभ्यासले आहे. पाणी
ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. याच कारणामुळे वाळवंटी प्रदेशात
लोकसंख्या खूपच कमी आढळते, जी काही विरळ लोकसंख्या वाळवंटी
प्रदेशात आढळते तीसुद्धा एखाद्या पाण्याच्या स्त्रोताभोवती आढळते. ज्या
ठिकाणी पाण्याची उपलब्धता सर्वाधिक असते जसे की पठारे नदीखोरे किनारी प्रदेश अशा
प्रदेशांमध्ये दाट लोकसंख्या आढळते
४) मृदा
सुपीक मृदा शेतीसाठी आवश्यक असते.
उदाहरणार्थ दख्खन पठारावरती आढळणारी काळी कापसाची मृदा, गंगेच्या
खोऱ्यामध्ये आढळणारी गाळाची सुपीक मृदा तसेच ब्रह्मपुत्रा सिंधू या नदी
खोऱ्यांमध्ये लोकसंख्या दाट आढळते तर वाळवंटी प्रदेश, निर्वनीकरण
प्रदेश या भागांमध्ये मृदेची धूप सतत होत असते त्यामुळे हे प्रदेश शेतीसाठी
प्रतिकूल असतात त्यामुळे येथे मानवी वस्ती आढळत नाही.
१) शेती
एखाद्या
प्रदेशांमध्ये सुपीक जमीन तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे पुरेसे घटक उपलब्ध असतील तर
तो प्रदेश जास्त लोकसंख्येचे पोषण करू शकतो जास्तीत जास्त लोक अशा प्रदेशांमध्ये
राहणे पसंत करतात शेतीचे प्रकार पिके शेतीच्या पद्धती यांसारख्या वैशिष्ट्यांचा
लोकसंख्या वितरणावर परिणाम होत असतो.
एखाद्या
प्रदेशातील शेतकरी ठराविक काळासाठी शेती करत असतील तर शेती झाल्यानंतर पशुपालन
करण्यासाठी ते दुसऱ्या ठिकाणी गवताळ प्रदेशामध्ये स्थलांतर करतात यामुळे लोकसंख्या
वितरणावर ती परिणाम होतो.
२) खाणकाम
खनिजे
ही नैसर्गिक संपत्ती आहे. प्रदेशांमध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणात असते
तो प्रदेश जास्तीत जास्त लोकसंख्येला रोजगारासाठी आकर्षित करत असतो.
उदाहरणार्थ छोटा नागपूरचे पठार हे भारतातील खनिज संपत्तीने समृद्ध असे पठार आहे
इतर उदाहरणे- ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणी, मध्य आशियातील
खनिज तेलाचे साठे असणारे प्रदेश या भागांमध्ये कुशल तसेच अकुशल कामगारांची
आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते म्हणून या प्रदेशाची लोकसंख्या दाट असते.
३) वाहतूक
ज्या
प्रदेशामध्ये वाहतुकीचे विविध मार्ग उपलब्ध असतात त्या प्रदेशांमध्ये जास्त
लोकसंख्या आढळते. उदाहरणार्थ महानगरे दिल्ली,मुंबई, नागपूर,
चेन्नई, बंगलोर, पुणे इत्यादी या शहरांमध्ये रस्ते,
रेल्वे, हवाई मार्ग तसेच काही शहरांमध्ये सागरी मार्गसुद्धा
उपलब्ध आहेत. वाहतूक हा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे.
सागरी
वाहतुकीमुळे आंतरराष्ट्रीय शहरे जोडली गेली आहेत त्यातून बंदरांची शहरे ही
संकल्पना उदयास आली आहे
ज्या
ठिकाणी वाहतूक व्यवस्था प्रतिकूल असते तिथे लोकसंख्या विरळ आढळते. तिथे ये जा करणे
आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते उदा. पर्वतीय डोंगराळ प्रदेश, हिमालय पर्वत रांगा,
आल्प्स, रॉकीज पर्वत, इ.
काही
अविकसित, ग्रामीण, आदिवासी भागात वाहतुकीचा अभाव आढळतो व त्यामुळे लोकसंख्या ही
कमी आढळते.
४) नागरीकरण
ज्या ठिकाणी वाहतूक, रोजगार, आधुनिक सोईसुविधा, उच्च राहणीमान, उच्च
शिक्षणाच्या अधिकाधिक उत्तम सुविधा, आरोग्याच्या आधुनिक सुविधा, चांगले
प्रशासन इ. घटक उपलब्ध असतात त्याला नागरी प्रदेश
असे म्हणतात, व त्या प्रक्रियेला नागरीकरण असे म्हणतात. हे सर्व घटक जास्तीत जास्त
लोकसंख्या आकर्षित करतात. यामुळे, भारतातील जवळपास ६०% लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते.
५) राजकीय घटक व शासकीय धोरणे:
अपुऱ्या व निम्न दर्जाच्या प्रशासकीय, शिक्षण व आरोग्याच्या
सुविधा यामुळे लोकसंख्या घनता कमी आढळते. नागरी तंटे,वाद-विवाद, हिंसा,
भ्रष्टाचार यामुळे लोकसंख्या घनता कमी आढळते. सुरक्षित, विश्वसनीय, सहकार्य
करणारे प्रशासन असलेल्या भागात लोकसंख्या घनता जास्त आढळते.
उदा. स्वातंत्र्यानंतर भारत-पाकिस्तान फाळणीमुळे दोन्ही
देशांची लोकसंख्या संरचना बदलली.
सिरीयामधील वादामुळे तेथील लोकांना जबरदस्तीने स्थलांतर
करावे लागते आहे.
याउलट स्थिर प्रशासन असलेल्या भागात दाट लोकसंख्या आढळते.
उदा. सिंगापूर,
काहीवेळा प्रशासन स्वतः लोकसंख्या कमी करण्यासाठी
स्थलांतराला प्रोत्साहन देते. उदा. टोकियो सरकार ते शहर सोडून दुसरीकडे स्थलांतर
करणाऱ्यांना मोबदला देते.
अशा प्रकारे वरील सर्व घटक कमी अधिक प्रमाणात जागतिक
लोकसंख्या रचनेवर परिणाम करत असतात. या घटकांसोबत समुद्र किनाऱ्याचे सान्निध्य,
उर्जा स्त्रोतांची उपलब्धता, सांस्कृतिक घटक, आर्थिक क्रिया, स्थलांतर, विज्ञान
तंत्रज्ञान इ. घटकही परिणाम करत असतात.
१.५ लोकसंख्या बदलाचे घटक-
खालील तीन घटक लोकसंख्या बदलास कारणीभूत असतात.
अ) ढोबळ जन्मदर ब) ढोबळ मृत्युदर क) स्थलांतर
अ) ढोबळ जन्मदर- दर हजारी
लोकसंख्येमागे जिवंत बालकांची संख्या म्हणजे ढोबळ जन्मदर होय.
ब) ढोबळ मृत्युदर- ठराविक काळात
दर हजारी लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या म्हणजे ढोबळ मृत्युदर होय.
या दोन्हीपैकी एका दरामध्ये किंवा दोन्ही दरांमध्ये बदल
झाल्यास लोकसंख्या रचना बदलते. जास्त जन्मदर व कमी मृत्युदर लोकसंख्या वाढीस
कारणीभूत ठरतो. पण दोन्ही दर जास्त असतील तर लोकसंख्या कमी होत जाते.
क) स्थलांतर- जन्मदर व मृत्युदाराशिवाय
लोकसंख्या रचनेवर परिणाम करणारा घटक म्हणजे स्थलांतर. माणसे एका ठिकाणाहून
दुसऱ्या ठिकाणी कमी अधिक काळासाठी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी हालचाल करतात
त्याला स्थलांतर असे म्हणतात.ज्या ठिकाणाहून लोक निघून जातात त्या ठिकाणाला
निर्गमन प्रदेश किंवा मूळ प्रदेश असे म्हटले जाते तर ज्या ठिकाणी लोक जाऊन राहतात
त्याला आगमन प्रदेश किंवा गंतव्य स्थान असे म्हणतात. निर्गमन प्रदेशात लोकसंख्या
घटत जाते तर आगमन प्रदेशात लोकसंख्या वाढत जात्ते.
लोकसंख्या वाढ/बदल:
ठराविक काळामध्ये लोकसंख्या संरचनेत लोकसंख्येमध्ये बदल-वाढ
किंवा घट होत असते. हे बदल त्या त्या सामाजिक आर्थिक स्तरानुसार वेगवेगळे आढळतात.
एखाद्या प्रदेशमध्ये लोकसंख्या कमी असेल आणि तिथे मानवी
संसाधनाची कमतरता असेल तर त्या ठिकाणी एका मर्यादेपर्यंत होणारी लोकसंख्या वाढ ही
सकारात्मक बाब ठरू शकते. परंतु एखाद्या प्रदेशात मुळातच अति लोकसंख्या असेल तर
तिथे मात्र लोकसंख्या वाढ ही नकारात्मक बाब ठरते. त्याचा आर्थिक विकासावरही परिणाम
होत असतो.
भारतामध्ये लोकसंख्या वाढीमुळे गरिबी, बेकारी यांचे
निर्मूलन करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे विकासदरही मंदावत आहे.
हे बदल स्थान-कालपरत्वे बदलत असतात. म्हणजेच प्रदेशानुसार, काळानुसार हे
बदल वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतात. या अभ्यासासाठी लोकसंख्या संक्रमण सिद्धांत
मांडला गेला. खालील तक्त्यामध्ये या सिद्धांताचे निरनिराळे टप्पे दर्शविलेले आहेत.
टप्पा क्र. |
टप्प्याचे नाव |
जन्मदर |
मृत्युदर |
वैशिष्ट्ये |
उदाहरणे |
1 |
अतिशय
स्थिर |
अधिक
|
अधिक
|
अविकसित
अर्थव्यवस्था |
सध्या
कोणताच देश या स्थितीत नाही. |
2 |
आरंभीच्या
काळात विस्तारणारा |
स्थिर
|
कमी |
वाढत्या
लोकसंख्येचे विकसनशील देश - लोकसंख्या
विस्फोट |
कांगो
, नायजर,
उगांडा, बांगलादेश |
3 |
नंतरच्या
काळात विस्तारणारा |
कमी |
कमी |
विकसनशीलकडून
विकसित वर्गामध्ये जाणारे देश- अत्यल्प लोकसंख्या वाढ |
चीन, भारत |
4 |
कमी
स्थिर कमी बदल दर्शवणारा |
खूप कमी |
खूप कमी |
देशाची
व नागरिकांची आर्थिक स्थिती अधिक सुधारित |
यू
एस ए. |
5 |
ऋणात्मक
वाढ |
खूप कमी |
कमी |
बालकांची
अत्यल्प लोकसंख्या , जास्तीत
जास्त लोकसंख्या तृतीयक व्यवसायात गुंतलेली असते. |
स्वीडन
, फिनलंड |
·
लोकसंख्या संक्रमण
सिद्धांताच्या मर्यादा:
- प्रत्येक देशाची सामाजिक आर्थिक स्थिती वेगळी असते कारण त्यासाठी आवश्यक असणारे घटकही निराळे असतात.
- आफ्रिकेच्या बहुतांश ग्रामीण प्रदेशात एड्ससारख्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आजही जास्त आहे. त्यामुळे तेथील मृत्युदर जास्त आहे.
- स्थलांतरामुळेही लोकसंख्या रचना बदले हे या सिद्धांतामध्ये विचारात घेतलेले नाही.
लोकसंख्येचे घटक |
|
लोकसंख्येच्या मोजता येणाऱ्या गुणधर्माना लोकसंख्येचे घटक
म्हणतात. |
लोकसंख्येच्या घटकांचे सर्वसामान्य स्वरूप म्हणजे
लोकसंख्या रचना होय. |
उदा. लिंग गुणोत्तर, लोकसंख्या घनता, वैवाहिक स्थिती. इ. |
लिंग गुणोत्तर व वयोगट या घटकांच्या आधारे लोकसंख्या
मनोरा बनवल्यास लोकसंख्या अवलंबित्वाचे गुणोत्तर समजते. |
· पहिल्या पाठचा सारांश:
· लोकसंख्या: एक मानवी संसाधन
· जागतिक लोकसंख्येचे वितरण
· लोकसंख्या शास्त्रीय संकल्पना
· लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक- प्राकृतिक व मानवी घटक
·
लोकसंख्या बदलाचे घटक, लोकसंख्या
वाढ
· लोकसंख्या संक्रमण सिद्धांत
· लोकसंख्येचे घटक व लोकसंख्या रचना