१२ वी भूगोल: पाठ क्र. १ - स्वाध्याय



प्र. १) अचुक सहसंबंध ओळखा
१) A) सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते
    R) सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते
१) केवळ A बरोबर
२) केवळ R बरोबर
३) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
४) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही

२) A) प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.
   R) जन्मदर व मृत्युदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो.
१) केवळ A बरोबर
२) केवळ R बरोबर
३) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
४) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
 
३) A) दुसऱ्या टप्प्यात मृत्यु दरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो
   R) दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते
१) केवळ A बरोबर
२) केवळ R बरोबर
३) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
४) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
 
प्रश्न २) टिपा लिहा.
(येथे उत्तरासाठी काही महत्त्वाचे मुद्दे फक्त दिलेले आहेत त्यांचे उत्तर लिहिताना सविस्तर वर्णन करावे)
 १) भूरचनेचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव
लोकसंख्या वितरण भूरचना-  या दोघांमधील सहसंबंध - उदाहरणे -नदी खोऱ्यामध्ये सपाट जमीन, सुपीक मृदा, मुबलक पाणी- जास्त लोकसंख्या-  याउलट वाळवंटी प्रदेश- नापीक मृदा -पाण्याची कमतरता -कमी लोकसंख्या- इतर प्रदेशांची उदाहरणे- पर्वतीय, जंगले, सागरी किनारे इ. – अपवादात्मक उदाहरणे- उत्तराखंड

 २) जन्मदर आणि मृत्यू दरातील सहसंबंध
जन्मदर संकल्पना- मृत्युदर संकल्पना- जर दोन्हींमध्ये वाढ झाली तर - जर दोन्हींमध्ये घट झाली तर-  जन्मदर वाढला आणि मृत्यु दर घटला - मृत्यू दर वाढला आणि जन्मदर घटला तर - लोकसंख्या वर होणारा परिणाम - हे सहसंबंध लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या माध्यमात दर्शवले आहेत - लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची थोडक्यात संकल्पना

 ३) लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याचा तिसरा टप्पा
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची प्रस्तावना- पाचही टप्प्यांची नावे -तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर व मृत्युदर - पुस्तकांमधील तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये-  देशांची उदाहरणे-  भारताचे उदाहरण दोन तीन वाक्यात स्पष्टीकरणासह

प्रश्न ३) भौगोलिक कारणे लिहा
 १) भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसरा टप्प्यातून जात आहे
१) लोकसंख्या संक्रमण सिद्धांत संकल्पना
२) तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये
३) तिसऱ्या टप्प्याची भारतात आढळणारी वैशिष्ट्ये - दरडोई उत्पन्न, राहणीमानाचा दर्जा
४) दारिद्र्य निर्मूलन, द्वितीय आणि तृतीयक आर्थिक क्रियांचा वाढता विस्तार, तंत्रज्ञानाचा वापर
५) कुटुंबाचा आकार आणि नियोजन यावर भर
६) आरोग्य,शिक्षण,साक्षरता यामधील प्रगती - या सर्वातून भारत एक विकसनशील अर्थव्यवस्था होऊ पाहत आहे
७) भारतामध्ये विकासाच्या अजून खूप संधी आहेत.
या सगळ्या वैशिष्ट्यमधून भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसरा टप्प्यातून जात आहे हे स्पष्ट होते

 २) लोकसंख्या वितरण असमान असते
१) लोकसंख्या वितरणाची संकल्पना
२) जगातील लोकसंख्या वितरण नकाशा
३) लोकसंख्या वितरणावर आणि प्राकृतिक व मानवी घटक सहसंबंध
४) जास्त लोकसंख्या घनता असलेले प्रदेश – प्राकृतिक व मानवी घटक
५) उदाहरणे-
६) कमी लोकसंख्या घनता असलेले प्रदेश - प्राकृतिक व मानवी घटक
७) उदाहरणे
८) अंटार्क्टिकाचे उदाहरण
९) सारांश- प्राकृतिक व मानवी घटकांचे वितरण असमान – लोकसंख्या वितरण असमान

 ३) वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते
 १) वाहतुकीचे विविध प्रकार
२) रस्त्यांचे फायदे- दारापर्यंत सुविधा मिळते.
३) रेल्वे मार्गाचे फायदे- अवजड लांब अंतरावरील वाहतूक
४) सागरी मार्ग अंतर्गत जलमार्ग – अवजड लांब अंतरावरील वाहतूक – आंतरराष्ट्रीय स्तरावर 
५) हवाई मार्गाचे फायदे – मौल्यवान वस्तूंची वाहतूक
६) या सर्वांशिवाय एखाद्या प्रदेशाचा विकास होणे अशक्य आर्थिक क्रियांचा विकास होणे अशक्य
७) जर एखादा प्रदेश वाहतुकीस अनुकूल नसेल तर तेथे लोकसंख्या आकर्षित होत नाही- विकास मार्गात अडथळे निर्माण होतात
८) याउलट वाहतुकीच्या आधुनिक सोयीसुविधांनी समृद्ध प्रदेश-  जास्तीत जास्त लोकसंख्या आकर्षित करतात
९) त्या भागांमध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते - मानवी जीवनामध्ये वाहतुकीस अनन्यसाधारण महत्त्व आहे- त्यामुळे लोकवस्ती वाढते.

 ४) लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायाची वाढ होते.
 १) द्वितीय व तृतीय आर्थिक क्रियांची संकल्पना व उदाहरणे
२) लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा वत्याची थोडक्यात वैशिष्ट्ये
३) या आर्थिक क्रियांमुळे प्रगतीला चालना मिळते- उच्च राहणीमानाचा दर्जा जास्तीत जास्त असतो
४) तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी आणि त्यासाठी उच्च शिक्षणाची गरज
५) लोकसंख्या ही वाढणारी असल्याने उच्च राहणीमानाचा दर्जा राखण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादनाची मागणी
६) जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा जास्त असल्याने लोकसंख्या वाढतच राहते
७) या सर्व कारणांमुळे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायाची वाढ होते.

 ५) जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू शकते
 १) लोकसंख्या संरचना संकल्पना
२) लोकसंख्या वाढ सूत्र - लोकसंख्या वाढ = सध्याची लोकसंख्या व आधीची लोकसंख्येतील फरक
३) यावरून असे लक्षात येते की जन्मदर आणि मृत्युदर यावरती लोकसंख्येची वाढ अवलंबून असते
४) जर जन्मदर कमी आणि मृत्युदर जास्त असेल तर लोकसंख्या स्थिर किंवा घटती असू शकते
५) याउलट जर जन्मदर कमी आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या वाढत राहते कारण मृत्युदराचे प्रमाण त्या तुलनेने कमी असते, लोकांची आयुर्मर्यादा जास्त असल्याने लोकसंख्या वाढताना दिसून येते
 
६) लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून आहे.
१) लोकसंख्या म्हणजे काय – एखाद्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची संख्या
२) लोकसंख्या घनता म्हणजे काय - एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकल ची संख्या म्हणजे लोकसंख्या घनता होय
३) म्हणजेच लोकांची संख्या आणि एकक क्षेत्रफळ या दोघांपैकी एक जरी घटक बदलला तरी लोकसंख्या घनता बदलते
४) कमीत कमी क्षेत्रफळा मध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या राहत असेल तर लोकसंख्या घनता जास्त असते
५) उदाहरणार्थ दिल्ली, मुंबई इत्यादी
६) कमीत कमी लोकसंख्या जास्तीत जास्त क्षेत्रफळावर राहत असेल तर लोकसंख्या घनता कमी असते
७) उदाहरणार्थ अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार ब्राझील इत्यादी
८) यावरून लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यावर अवलंबून असते हे दिसून येते
 
प्र.४) सविस्तर उत्तरे लिहा

१) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते?
लोकसंख्या वितरणाची संकल्पना- लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक यादी/तक्ता/आकृती-  प्रत्येक घटकाचे उदाहरणासहित स्पष्टीकरण- अपवाद - सारांश

२) लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.
लोकसंख्यासंक्रमण सिद्धांत आकृतीसह थोडक्यात स्पष्टीकरण-  पहिला आणि पाचव्या टप्प्याची वैशिष्ट्ये- नावे -पहिल्या आणि पाचव्या टप्प्यातील फरक सारांश

 

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पाचवा टप्पा

जन्मदर

जास्त

खूप कमी

मृत्युदर

जास्त

खूप कमी

जन्मदरामागील कारणे

निरक्षरता, कुटुंबाचा आकार मोठा, लोकांमधील गैरसमज इ.

कुटुंब नियोजन, आरोग्य सुविधांबाबत जागृत नागरिक, शिक्षण, तंत्रज्ञान इ.

मृत्युदरामागील कारणे

कुपोषण , आरोग्य सुविधांचा अभाव , रोगराई  इ.

संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण, पोषक पर्यावरण, उच्च साक्षरता दर  इ.


३) चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील

लोकसंख्यासंक्रमण सिद्धांत संकल्पना- चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांची उदाहरणे व वैशिष्ट्ये- या टप्प्यातील देशांच्या समस्या खालील प्रमाणे

१) वयोवृद्ध लोकसंख्येचे प्रमाण जास्त - कमी जन्मदर आणि मृत्यूदर त्यामुळे लोकांच्या वयोमर्यादेमध्ये वाढ आयुर्मान वाढ

२) तरूण लोकसंख्येचे प्रमाण कमी -कारण जन्मदर कमी- याचा परिणाम तरुण लोकसंख्या म्हणजेच कार्यकारी लोकसंख्येवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त-

३) कमी लोकसंख्येमुळे ग्राहकांचे,मजुरांचे प्रमाण कमी - हे देश तंत्रज्ञानावर अतिजास्त अवलंबून - परिणामतः या सर्वाचा अर्थव्यवस्थेवर ती परिणाम होत असतो

४) यावर उपाय