अभ्यासक्रमाची ओळख:
इयत्ता
अकरावीमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला. प्राकृतिक भूगोलामध्ये चार
महत्वाच्या आवरणांचा अभ्यास केला जातो- मृदावरण, जलावरण, जीवावरण, वातावरण.
भूगोलाच्या दोन
प्रमुख उपशाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल.
त्यापैकी एक
म्हणजेच प्राकृतिक भूगोल आपण अकरावीमध्ये अभ्यासली आहे तर दुसरी महत्वाची शाखा
म्हणजेच मानवी भूगोल आपण इयत्ता बारावीमध्ये शिकणार आहोत.
“मानवी भूगोल म्हणजे अस्थिर पृथ्वी आणि चंचल मानव यांच्यामधील परिवर्तनशील संबंधांचा
अभ्यास होय.”
- एलन सेम्पल (अमेरिकन भूगोल अभ्यासक)
मानवी
भूगोलामध्ये निसर्ग व मानव यांच्या सहसंबंधांचा अभ्यास केला जातो. म्हणून
अकरावीमध्ये आपण आधी नैसर्गिक भूगोलाचा अभ्यास केला आणि त्याचा मानवी भूगोलामध्ये
प्राकृतिक घटकांचा संबध कसा येतो याचा अभ्यास बारावीमध्ये करणार आहोत.
तुम्हाला
प्राकृतिक भूगोलाचे घटक आठवतात का?
पृथ्वीचे
अंतरंग, भू हालचाली, विदारण, क्षरण, हवामानाचे प्रदेश, जागतिक हवामान बदल, महासागरातील संसाधने, भारतीय
महासागर, जीवसंहती, आपत्ती व्यवस्थापन या सर्व घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. यावरून खडक, क्षार, भूरूपे, मृदा,वनस्पती, प्राणी, वातावरण, क्षरणाची
कारके(नदी,वारा इ.), हवा, हवामान,महासागर इ. प्राकृतिक भूगोलाचे घटक आहेत हे स्पष्ट होते.
त्याचप्रमाणे
यावर्षी आपण मानवी भूगोल शिकताना मानवी भूगोलाचे घटक अभ्यासणार आहोत. मानवी
भूगोलाचे कोणते घटक असतील?
ज्यावेळी आपण
मानवी भूगोल असे म्हणतो, म्हणजेच पहिल्यांदा लक्षात येणारा घटक – मानव, माणूस. मग
अशी किती माणस आहेत पृथ्वीवर, भारतात? म्हणजेच आपण मानवी लोकसंख्या हा घटक विचारात घेत
असतो. मग ही माणस राहतात कोठे? मानवी वस्ती, ही माणस जगतात कशी, खातात काय? तर
उत्तर मिळते- शेती, त्यातून विकसित झाल्या त्या मानवी आर्थिक क्रिया, त्यानंतर प्रदेश
व प्रादेशिक विकास या संकल्पना उदयास आल्या. म्हणून हे सर्व
मानवी भूगोलाचे महत्वाचे घटक आहेत. या सर्व घटकांचा प्राकृतिक भूगोलाशी असणारा
सहसंबंध अभ्यासणे महत्वाचे ठरते. त्यासाठी अभ्यासक्रमामधील शेवटचे प्रकरण म्हणजे
मानवी भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती.
मला आशा आहे कि
तुम्ही हा अभ्यासक्रम मनापासून अभ्यासाल.
त्यासाठी खूप
खूप शुभेच्छा!
अकरावी व बारावी भूगोलाच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठ व मलपृष्ठाच्या या इमेजेस आहेत. त्यांचे निरीक्षण करून त्यातील फरक ओळख. त्या फरकांचे प्राकृतिक व मानवी भूगोलाचे घटक असे वर्गीकरण करा.